Saturday, 11 March 2017

यशाचा मंञ

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सुचना..

1) स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करु नका तर तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवा. प्रत्येक गोष्टीत अभ्यास शोधा तरच तुमच्यामध्ये भावी अधिकारी होण्याचे गुण तयार होतील.

2) अनेक जण फक्त पाठांतरावर जास्त जोर देतात. आणि आपली बौद्धिक पातळी वाढवतात परंतू परिस्थितीला समजून घेण्याची क्षमता वाढवत नाहीत.घोकंपट्टी करण्याऐवजी समजून उमजून लक्षात ठेवण्यावर भर द्या.

3) अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक विद्यार्थी मार्गदर्शन वर्ग (अॅकडमी) लावण्यास उत्सूक नसतात. कारण अनेक ठिकाणांवरुन मार्गदर्शक वर्गांनी आम्हाला बूडवले, मार्गदर्शकांना काहीच येत नाही तर ते आपल्याला काय शिकविणार? असे अनेक प्रश्न आपल्या मनात घर करुन बसतात.मान्य आहे की अश्या वर्गांचे तोटे किंवा काही मर्यादा अस तातच. पण एक गोष्ट मी जरुर तुम्हास सांगेल की अभ्यासाच्या प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन वर्ग जरुर लावला पाहिजे जेणे करुन आपणास अभ्यास कसा करावा हे समजेल. जेथेही तुम्ही क्लास लावाल तेथील वातावरणात मिसळून जाण्याचा प्रयत्न करा. वर्गातील मुलामुलींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करु नका. गटचर्चा आवश्यक असते.

4) मार्गदर्शन वर्गामध्ये कोणते शिक्षक शिकविणार आहेत याची आधीच माहिती घ्या जर त्या शिक्षकांनी युपीएससी च्या परीक्षा दिलेल्या असतील तर, असेच क्लासेस लावा. कारण जुन्या पद्धतीने अभ्यास केलेले मार्गदर्शक तुम्हास योग्य किंवा परीक्षाभिमूख मार्गदर्शन करु शकण्यास असमर्थ आहेत. विषयामध्ये खुप हुशार अभ्यासू मार्गदर्शक नसावा तर त्या विषयातील संकल्पना व त्यामागील गोष्टींचे स्पष्टीकरण देणारा व्यक्ती असावा

5) मार्गदर्शन वर्गात जे विषय शिकविले जात आहेत त्याच विषयाचा अभ्यास सर्वात जास्त करावा नाहीतर शिक्षक भूगोल शिकवतात आणि तुम्ही इतिहास, मराठी हा विषय वाचत असतात. जे प्रकरण शिक्षकांनी शिकविले त्याच प्रकरणाचा अभ्यास एखाद्या चांगल्या संदर्भ ग्रंथातून करावा जेणे करुन वर सांगितलेल्या सर्व प्रश्न प्रकारांनुसार तुम्ही विचार कराल आणि कमी वेळेत त्या संबंधीत विषयात पारंगत व्हाल.

6) उद्या करावयाच्या अभ्यासाचा आजच आढावा घेऊन वेळेचे योग्य नियोजन करा.

7) या परीक्षेची तयारी करणारी अनेक मुले लायब्ररी किंवा शांत अभ्यासिकेत मध्ये अभ्यास करतात परंतु सावधान.......! तुम्ही अशाच अभ्यासिका लावा जेथे फक्त स्पर्धा परीक्षांच्या तयारी करना-या विद्यार्थ्यांसाठीच प्रवेश असेल.

8) परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या आपल्या स्वतःच्या नोट्सला सार्वजनिक करु नये यामुळे तुमचाच तोटा होईल.

9) चहा पितांना, बस, रेल्वे मध्ये प्रवास करतांना छोटया नोट्सचे वाचन करावे.

10) अनेक पूस्तकांचे वाचन करण्यापेक्षा काही चांगल्या लेखकांच्या पूस्तकांचे च वाचन करावे. व आपल्या स्वतःच्या शब्दात नोट्स काढाव्यात.

11) चालू घडामोडीचा अभ्यास दररोज करावा. (यासाठी लोकसत्ता, म.टा. हे वृत्तपत्र व योजना, लोकराज्य यांसारखे मासिके वाचून नोटस् काढयाव्यात.) कारण हा विषय दररोज बदलत असतो आणि नविन स्वरुपात तयार होत असतो.

12) सिंहावलोकन करण्यास विसरु नये.

No comments:

Post a Comment